Help / मदत व वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा कसा करावा?
- आपला मालमत्ता क्रमांक व मालमत्तेची माहिती तपासा.
- "Pay Now / आता भरा" या बटणावर क्लिक करा.
- UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा उपलब्ध इतर पेमेंट पर्याय निवडा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
- पेमेंट पूर्ण होईपर्यंत ब्राउझर Refresh किंवा Close करू नका.
- यशस्वी पेमेंट झाल्यानंतर आपली पावती (Receipt) आपोआप तयार होईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. पैसे भरल्यानंतर पावती मिळाली नाही.
बँकेकडून व्यवहाराची पुष्टी येण्यासाठी १५ मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो. कृपया १५ मिनिटे प्रतीक्षा करून पुन्हा तपासा.
२. खात्यातून पैसे वजा झाले पण व्यवहार Pending किंवा Failed दिसत आहे.
कृपया १५ मिनिटे प्रतीक्षा करा. यशस्वी व्यवहार असल्यास पावती आपोआप तयार होईल. व्यवहार अयशस्वी झाल्यास संबंधित बँकेच्या नियमानुसार रक्कम काही कामकाजाच्या दिवसांत खात्यात परत जमा केली जाईल.
३. व्यवहार Pending असताना पुन्हा पेमेंट करावे का?
नाही. कृपया किमान १५ मिनिटे प्रतीक्षा करा. त्यानंतरही व्यवहार पूर्ण झाला नसेल तरच पुन्हा पेमेंट करा.
४. चुकून दोन वेळा पेमेंट झाले असल्यास काय करावे?
कृपया दोन्ही व्यवहारांचे तपशील घेऊन नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधा.
५. कोणकोणत्या पद्धतीने पेमेंट करता येते?
UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेमेंट गेटवेवर उपलब्ध इतर पर्याय.
६. ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आहे का?
होय. सर्व व्यवहार सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड पेमेंट गेटवेमार्फत केले जातात.
७. पावती पुन्हा कशी मिळेल?
यशस्वी व्यवहारानंतर आपण Payment History मधून पावती पुन्हा डाउनलोड करू शकता.
८. अधिक मदतीसाठी
कृपया आपल्या मालमत्ता क्रमांक व व्यवहार क्रमांकासह नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.
How to Pay Property Tax Online?
- Verify your Property ID and property details.
- Click on the Pay Now button.
- Select your preferred payment method (UPI, Net Banking, Debit Card, Credit Card, etc.).
- Complete the payment process.
- Do not refresh or close the browser until the payment process is completed.
- After successful payment, your receipt will be generated automatically.
Frequently Asked Questions
1. Payment is successful but the receipt is not generated.
It may take up to 15 minutes for the bank to confirm your payment. Please wait and check again.
2. Amount is deducted but payment shows Pending or Failed.
Please wait for 15 minutes. If the payment is successful, the receipt will be generated automatically. If the transaction fails, the amount will be refunded by your bank as per their policy.
3. Should I make another payment if the transaction is pending?
No. Please wait at least 15 minutes before trying again to avoid duplicate payments.
4. What should I do if I paid twice?
Please contact the Municipal Council with both transaction details.
5. Which payment methods are available?
UPI, Net Banking, Debit Card, Credit Card and other options available on the payment gateway.
6. Is online payment secure?
Yes. All transactions are processed through a secure encrypted payment gateway.
7. How can I download my receipt again?
You can download your receipt anytime from the Payment History section after successful payment.
8. Need Help?
Please contact the Municipal Council with your Property ID and Transaction Reference Number.